spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा बँकेने घेतला मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा बँकेने घेतला मोठा निर्णय

spot_img

पिक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांकडुन यापुढे व्याज वसुल न करण्याचा जिल्हा बँकेचा निर्णय / मुख्य कार्यकारी आधिकारी रावसाहेब वर्पे
अहमदनगर / नगर सह्याद्री –
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालु वर्षात रू.२९९५ कोटीचे कर्ज वाटप केलेले असुन चालु वर्षात आज अखेर ४६७४ कोटीचे पिक वसुलास पात्र असुन ३८३३ कोटीचे येणेबाकी कर्ज आहे. शासनाने दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून त्यांना अनुज्ञेय प्रोत्साहनपर व्याज अनुदान रक्कम वजा करून परत फेडीची रक्कम वसुल करणेबाबत दि.२७ मार्च २०२४ च्या सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी कळविल्यानुसार अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चालू अथकीत वसुलास पात्र पिक कर्ज वसुलीबाबत फक्त मुद्दल कर्ज वसुल करणेबाबत निर्णय झालेला आहे. त्यानुसार याबाबत शाखांना सविस्तर सुचना कळविल्या असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

सद्यस्थितीत गतसालाच्या तुलनेत बँकेचा वसुल कमी प्रमाणात होत असुन शासनाकडुन शेतक-यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदान देणे कामी योजने अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून बँकेला सन २०१९-२०२० ते आजपर्यंत १७६ कोटीचे व्याज परतावा अदयापही जमा झालेला नाही तसेच महाराष्ट्र शासनाकडुन डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत परतावा योजने अंतर्गत कर्जदार शेतक-यांना देण्यात येणारे व्याज सवलत सन २०२१ पासुनची ४०१५९९ सभासदांचे ९९ कोटी ७५ लाखाचे व्याज शासनाकडुन अदयापही जमा झालेला नाही.

बँक ठेवीदाराच्या पैशातुनच सर्व प्रकारचे कर्ज वाटप करीत असल्याने व बँकेस ठेवीदारांना मात्र त्यांच्या ठेवी व ठेवीवरील व्याज नियमित द्यावे लागते. सदरच्या शासनाकडून व्याज परतावा वेळेत न आल्याने बँकेवर व प्राथ.वि.का.सेवा संस्थावर त्याचा विपरीत परिणाम होत असुन शासनाने वेळेत व्याज परतावे जमा दिल्यास बँक व वि.का.सेवा संस्थांची आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत बँक शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहे अशी माहीती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! 3 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा तर ‘या’ सात जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...