spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! एप्रिलच्या हप्त्या कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची...

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! एप्रिलच्या हप्त्या कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

spot_img

Ladki Bahin Yojana; महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. आता लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, आता एप्रिलच्या हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

काल आदिती तटकरे पुण्यात माध्यमांशी बोलत असताना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, एप्रिल महिना संपण्याआधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरीत केला जाणार आहे. दरम्यान, आदिती तटकरेंनी अद्याप तारीख सांगितलेली नाही. परंतु आठवड्याभरात एप्रिलचा हप्ता देण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी एप्रिलचे १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या सगळ्यावर आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. मला वाटतंय या योजना संदर्भात गैरसमज करून घेतला आहे, अडीच लाखांपेक्षा कमी उत्पादन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या महिला संजय गांधी निराधार योजनचा लाभ घेतात ते या योजनेसाठी पात्र नाही.

ज्या महिला नमो शेतकरी योजेतून लाभ घेतात त्यांना 1000 रुपये लाभ मिळतो, मात्र त्यांना 1500 मिळावे म्हणून लाडक्या बहिण योजकडून त्यांना 500 रुपये लाभ मिळतो हे सर्व शासन निर्णय आहे.२ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी आहेत, शेवटचा लाभ दिला तेव्हा 2 कोतो 33 लाख महिला होत्या, ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा लाभ मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...