spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहि‍णींसाठी आली खुशखबर! १५०० रुपये जमा होणार?, वाचा सविस्तर

लाडक्या बहि‍णींसाठी आली खुशखबर! १५०० रुपये जमा होणार?, वाचा सविस्तर

spot_img

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता पुढच्या आठ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. दरम्यान, आता हे पैसे लवकरच महिलांना मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ दिवसांत जमा होतील, असं अजित पवारांनी सांगितलं होतं.

दरम्यान अजूनही पैसे जमा झाले नाहीत. मात्र, आता ८ दिवसांत नक्कीच महिलांना पैसे मिळणार आहेत. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. त्यामुळे पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातील. मागील तीन महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे. या महिन्यातही शेवटच्या आठवड्यात पैसे जमा करतील.

मार्च महिन्यात ३ तारखेला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्याआधी कदाचित महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहेत.यासाठी अजून काही दिवस लागू शकतात. त्यामुळे आता पैसे कधीपर्यंत येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले जात होते. विधानसभा निवडणूका होऊन तीन महिने झाले आहेत तरीही लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळाले नाहीत. हे पैसे कदाचित राज्याच्या अर्थसंकल्पानंतर दिले जाऊ शकतात. अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत मोठी घोषणा करु शकतात. या अर्थसंकल्पानंतर कदाचित २१०० रुपये दिले जाऊ शकतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...