spot_img
ब्रेकिंगदिल्लीला चाललोय, केंद्रात बरोबर करतो!; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार खासदार निलेश लंके...

दिल्लीला चाललोय, केंद्रात बरोबर करतो!; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार खासदार निलेश लंके यांना नेमकं काय म्हणाले… पहा…

spot_img

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फोनवरुन निलेश लंके यांना सांगितलं!
अहमदनगर  | नगर सह्याद्री
मी शरद पवार यांना फोनवरुन बोललो. मात्र, ते दिल्लीला बैठकीसाठी जाणार आहेत. ‘दिल्लीला चाललोय, केंद्रात करतो ना बरोबर मी’, असे शरद पवार यांनी फोनवरुन म्हटल्याचे निलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच, दिल्लीवरुन आल्यानंतर मी त्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहितीही लंकेनी दिली. आता दिल्लीला जाऊन इंग्रजीत भाषण करणार असल्याचंही त्यांनी म्हटले.

मला तर विश्वासच बसत नाही, मी खासदार झालोय ते. मी दहावेळा कार्यकर्त्यांना विचारलं मी खरंच खासदार झालो का, असे म्हणत निलेश लंके यांनी विजयावर प्रतिक्रिया दिली. तसेच, शरद पवार यांची भेट घेण्यासाठी केव्हा जाणार असा प्रश्न विचारला असता.  त्यांनी हे उत्तर दिले.

आता मी खासदार झालो आहे, जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख झालो आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणी माझ्यावर टीका केली ते विसरुन जनतेच्या प्रश्नासाठी काम करणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं. या जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख असल्याने मी सर्व गोष्टी पोटात घेऊन पुढचं काम करणार आहे.

कांदा निर्यातबंदी आणि दूध दरवाढ यादोन्ही मुद्यांवर आचारसंहिता संपल्यानंतर मी  मोठ आंदोलन करणार असल्याचा इशाराही लंके यांनी दिला. एकूणच सरकार कोणाचेही असो, मात्र शेतकर्‍यांच्या मुद्द्यांवरती आपण आवाज उठवणार आहे, असे लंकेंनी म्हटले. तर, सत्कारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून, मी सोडून इतर सर्वजण खासदार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळेलच आणि सध्या पाहायला मिळत आहे, असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...