spot_img
ब्रेकिंगजिहादी हल्ल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या!; आ.संग्राम जगताप

जिहादी हल्ल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या!; आ.संग्राम जगताप

spot_img

कोल्हापूरमधील कानवड येथे हिंदू जन आक्रोश मोर्चात आवाहन
कोल्हापूर ।नगर सहयाद्री:-
जिहादी वृत्तीने हिंदूंवर केलेले हल्ले व अत्याचार आम्ही सहन करणार नाही. त्याच क्षणी सडेतोड उत्तर द्या!, अशा शब्दांत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी गर्जना केली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कानवड येथे झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चात त्यांनी प्रखर शब्दांत मनोगत व्यक्त केले.

अलीकडेच अक्षय कोळी व त्यांच्या कुटुंबावर काही जिहादी वृत्तीच्या नागरिकांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्याचा व घरफोडीचा तीव्र निषेध व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांनी संताप व्यक्त केला. या मोर्चात उपस्थित नागरिकांच्या जयघोषाने वातावरण दणाणून गेले होते. आमदार जगताप यांच्या प्रभावी भाषणाने सभा गाजली. अक्षय कोळी व कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सकल हिंदू समाज त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
जिहादी विचारसरणीच्या समूहाकडून नेहमीच हिंदूंवर विनाकारण हल्ले व अत्याचार केले जातात.

त्यामुळे हिंदूंच्या संरक्षणासाठी एकजूट करून लढा देणे गरजेचे आहे. त्याकरिता हिंदू समाजात जनजागृती करून अन्यायग्रस्त कुटुंबांना संरक्षण देत जिहादींच्या हिंदूंवरील हल्ला व अत्याचाराला सडेतोड उत्तर द्या, असे आवाहन आमदार जगताप यांनी यावेळी केले. हिंदू बंधू अक्षय कोळी यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला हल्ला हिंदू समाज कधीही सहन करणार नाही. या अत्याचाराला उत्तर नक्कीच दिले जाईल. ज्या पद्धतीने अत्याचार होईल त्याच पद्धतीने हिंदू समाज इथून पुढे सडेतोड उत्तर देईल.

हभप संग्राम भंडारे महाराज म्हणाले की, इस्लामी सत्ता निर्माण करण्यासाठी हिंदूंवर जाणीवपूर्वक अत्याचार करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आपले रक्षण करण्यासाठी हिंदू समाज एकवटला पाहिजे. त्यासाठी हिंदुत्वाच्या संघटनेने प्रत्येक गावात गल्लीबोळांत जाऊन जनजागृती केली पाहिजेत. आगामी काळात हिंदूंवर झालेल्या अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे दाखवण्याची वेळ आली आहे. अक्षय कोळी व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण हिंदू समाज आहे. त्याची दखल प्रशासनाने घेऊन अक्षय कोळी यांच्यावर अत्याचार करण्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार केळकर यांना निवेदन देण्यात आले. कानवाढ प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय द्यावा, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...