spot_img
अहमदनगरझेडपी, पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज व्हा; ठाकरेंनी पारनेरच्या शिवसैनिकांना काय दिले आदेश...

झेडपी, पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज व्हा; ठाकरेंनी पारनेरच्या शिवसैनिकांना काय दिले आदेश पहा

spot_img

पारनेर शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचा आदेश | मातोश्रीवर बैठक
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील शिवसैनिकांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी एकजुटीने पूर्ण ताकदीने तयारी करावी, असा स्पष्ट आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

पारनेर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वात तालुयातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि निवडक शिवसैनिकांच्या मातोश्री वरील बैठकीत ठाकरे यांनी आवाहन केले. या बैठकीत तालुयातील राजकीय परिस्थिती, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची भूमिका, तसेच इतर राजकीय पक्षांकडून शिवसैनिकांना मिळालेली सापत्न वागणूक यावर सविस्तर चर्चा झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना सांगितले की, आगामी निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने तयारी करा.

महाविकास आघाडीने सहकार्य केल्यास ठीक, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जा. कोणाची वाट पाहू नका. सर्वांनी एकजुटीने पक्षसंघटना वाढवावी. काही अडचण असल्यास माझ्याशी थेट संपर्क साधा, मी सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्यांनी जुन्या आणि नव्या शिवसैनिकांना मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आणि शिवसेनेची ताकद दाखवून देण्याचे आवाहन केले. मागील राजकीय वाद विसरून नव्याने पुढे जाण्याचेही त्यांनी निर्देश दिले. या बैठकीत निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला. कुलाब्याचे माजी आमदार अशोकराव धात्रक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, डॉ. भास्कर शिरोळे, उपसभापती किसनराव सुपेकर, संतोष साबळे, सुभाष भोसले, सखाराम उजगरे, बाबाजी तनपुरे, निलेश खोडदे, डॉ. कोमल भंडारी, संजय मते, दौलत सुपेकर, संतोष येवले, पिराजी पवार, शिवाजी लाळगे, मोहन पवार, जयसिंग पवार यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत पठारेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मातोश्रीवर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुका शिवसेनाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुयातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले. यावेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. विधानसभा निवडणुकीतील नाराजीवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार ः डॉ. पठारे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी सर्वप्रथम आहे. पारनेर तालुयात शिवसेनेची ताकद ही मोठी असून येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे.
डॉ. श्रीकांत पठारे – (पारनेर, तालुकाप्रमुख शिवसेना (उबाठा)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मायलेकीच्या भांडणाचा फायदा घेतला! अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले, घडलेल्या घटनेमुळे शहर हादरले

मुंबई । नगर सहयाद्री:- डोंबिवलीत उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे ....

10 कोटींची फसवणूक! सॉफ्टवेअरमध्ये फेरफार; नगर शहरातील खळबळजनक प्रकरण..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शहरातील इलाईट इंटरनॅशनल या फर्ममध्ये काम करणार्‍या अकाउंटंटने त्याच्या साथीदाराच्या मदतीने...

दुहेरी हत्याकांड! आजीच्या डोक्यात कुकर घातला, आजोबांना विहिरीत फेकलं; कुठे घडली भयंकर घटना..

Maharashtra Crime News: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील गरसुळी गावात एक खळबळजनक घटना घडली आहे....

दोघे एकमेकांच्या विरोधात लढले पण विकासासाठी एकत्र आले! नगर जिल्ह्यातील दोन ‘बड्या’ नेत्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

 Ahilyanagar Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार राहुल जगताप, शिवसेना उद्धव...