spot_img
अहमदनगरझेडपी, पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज व्हा; ठाकरेंनी पारनेरच्या शिवसैनिकांना काय दिले आदेश...

झेडपी, पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज व्हा; ठाकरेंनी पारनेरच्या शिवसैनिकांना काय दिले आदेश पहा

spot_img

पारनेर शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचा आदेश | मातोश्रीवर बैठक
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील शिवसैनिकांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी एकजुटीने पूर्ण ताकदीने तयारी करावी, असा स्पष्ट आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

पारनेर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वात तालुयातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि निवडक शिवसैनिकांच्या मातोश्री वरील बैठकीत ठाकरे यांनी आवाहन केले. या बैठकीत तालुयातील राजकीय परिस्थिती, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची भूमिका, तसेच इतर राजकीय पक्षांकडून शिवसैनिकांना मिळालेली सापत्न वागणूक यावर सविस्तर चर्चा झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना सांगितले की, आगामी निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने तयारी करा.

महाविकास आघाडीने सहकार्य केल्यास ठीक, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जा. कोणाची वाट पाहू नका. सर्वांनी एकजुटीने पक्षसंघटना वाढवावी. काही अडचण असल्यास माझ्याशी थेट संपर्क साधा, मी सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्यांनी जुन्या आणि नव्या शिवसैनिकांना मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आणि शिवसेनेची ताकद दाखवून देण्याचे आवाहन केले. मागील राजकीय वाद विसरून नव्याने पुढे जाण्याचेही त्यांनी निर्देश दिले. या बैठकीत निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला. कुलाब्याचे माजी आमदार अशोकराव धात्रक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, डॉ. भास्कर शिरोळे, उपसभापती किसनराव सुपेकर, संतोष साबळे, सुभाष भोसले, सखाराम उजगरे, बाबाजी तनपुरे, निलेश खोडदे, डॉ. कोमल भंडारी, संजय मते, दौलत सुपेकर, संतोष येवले, पिराजी पवार, शिवाजी लाळगे, मोहन पवार, जयसिंग पवार यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत पठारेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मातोश्रीवर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुका शिवसेनाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुयातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले. यावेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. विधानसभा निवडणुकीतील नाराजीवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार ः डॉ. पठारे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी सर्वप्रथम आहे. पारनेर तालुयात शिवसेनेची ताकद ही मोठी असून येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे.
डॉ. श्रीकांत पठारे – (पारनेर, तालुकाप्रमुख शिवसेना (उबाठा)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...