spot_img
अहमदनगरअबब! कुलरमध्ये गांजा ठेऊन विक्री, पोलिसांनी अशा ठोकल्या बेड्या

अबब! कुलरमध्ये गांजा ठेऊन विक्री, पोलिसांनी अशा ठोकल्या बेड्या

spot_img

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर | नगर सह्याद्री
स्थानिक गुन्हे शाखेने गांजा विक्री करणार्‍यास ताब्यात घेतले आहे. सादीक फारुख शेख (वय २८, रा. नवीन बाजारतळ, ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या घरातील कुलरमध्ये गोणीत ठेवलेला ३८ हजार ५५० रुपये किंमतीचा ३ किलो ९८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

अधिक माहिती अशी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्याविरोधात कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/ हेमंत थोरात व अंमलदार संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, रोहित येमुल, उमाकांत गावडे व मपोकॉ/प्रियंका चेमटे आदींचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले. हे पथक शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असतांना सपोनि/हेमंत थोरात यांना २५ मार्च रोजी सादीक शेख हा गांजा विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत समजली. या पथकाने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोनि दिगंबर भदाने व स्टाफ तसेच पंच सोबत नवीन बाजारतळ येथे छापा टाकला.

घरातील कुलरमध्ये गोणीत उग्र वास येत असलेला बिया, बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत आरोपीस ताब्यात घेतले. पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...