spot_img
अहमदनगरअल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा मामाच्या गावातुन गजाआड; नगर शहरातील धक्कादायक प्रकार!

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा मामाच्या गावातुन गजाआड; नगर शहरातील धक्कादायक प्रकार!

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणार्‍या आरोपीस कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले आहे. चेतन संतोष सरोदे (रा. गांधी नगर, बोल्हेगाव, ता. जि. अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २७ सप्टेंबर २०२४ रोजी पिडीत मुलीच्या आईने कोतवाली पोलीसांना अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची माहिती दिली.

मुलगी २६ रोजी दुपारी बुरुडगाव रोड येथे अभ्यासा विषयी झेरॉस काढण्यासाठी कॉलेज च्या बाहेर आली होती. त्यावेळी आरोपी चेतन संतोष सरोदे हा दुचाकीवर फिर्यादीच्या पाठीमागुन आला व शिवीगाळ केली. बळजबरीने गाडीवर बसवुन बोल्हेगाव येथे घेऊन जात मारहाण करुन अत्याचार केला. तु कोणाला सांगितले तर तुझे फोटो तुझ्या घरी व कॉलेज मध्ये व्हायरल करेल, तुला जीवे मारेल अशी धमकी दिली. यावरुन फिर्याद दाखल झाल्याने पोलिस निरक्षिक प्रताप दराडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हेशोध पथकास सदर गुन्हयाबाबत माहिती देवून आरोपी व पिडीत मुलीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने तपास करुन आरोपी चेतन संतोष सरोदे यास त्याचे मामाचे गावी भानसहिवरा ता. नेवासायेथुन ताब्यात घेवुन सदर मुलीची सुटका केली. पुढील तपास म.पो.स.ई शितल मुगडे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधीकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, म.स.पो.नि योगिता कोकाटे, म.पो.स.ई. शितल मुगडे गुन्हे शोध पथकाचे म.पो.हे. कॉ रोहिणी दरंदले पो.हे.कॉ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, सुर्यकांत डाके, पो.कॉ अमोल गाढे, अभय कदम, सतीश शिंदे अतुल काजळे मपोकों सोनल भागवत व दक्षिण मोबाईल सेल चे पो.कॉ राहुल गुंडू यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...