spot_img
अहमदनगरशेत जमिनीचा वाद पेटला, नको तोच प्रकार घडला! दोन गटांच्या डजनभर लोकांवर...

शेत जमिनीचा वाद पेटला, नको तोच प्रकार घडला! दोन गटांच्या डजनभर लोकांवर गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर तालुयातील दरेवाडी येथे नारायण डोह रस्त्यावर एका शेत जमिनीच्या लोखंडी जाळीचे कंपाऊंड काढण्याच्या करणातून २ गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (दि.३०)सकाळी १०.३० ते ११ या कालावधीत घडली. या प्रकरणी या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी वरून दोन्ही गटाच्या १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली फिर्याद मच्छिंद्र भानुदास बेरड (वय ४२, रा.दरेवाडी) यांनी दिली असून या फिर्यादी वरून संतोष लहानू सूर्यवंशी, हरिभाऊ खर्से (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), पवन रामप्रसाद धूत (रा. सारसनगर), जगदीश रामविलास करवा (रा. फलटण, जि. सातारा), सिध्दार्थ बाळासाहेब भिंगारदिवे (रा. दरेवाडी), संतोष सुर्यवंशी याची दोन मुले (नाव माहित नाही, रा. सारसनगर) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेरड हे शेत जमिनीत काम करत असताना आरोपींनी शेतीचे लोखंडी जाळीचे कंम्पाऊंड तोडून नुकसान केले. त्याचा जाब विचारल्यावर बेरड यांना शिवीगाळ, लाथाबुयांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. बेरड यांची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. पठारे करत आहेत.

तर दुसरी फिर्याद हरिभाऊ जिजाबा खर्से (वय ४३, रा. बुर्‍हाणनगर, ता.नगर) यांनी दिली असून त्यानुसार मच्छिंद्र भानुदास बेरड, दीपमाला मच्छिंद्र बेरड, रंभा भानुदास बेरड, साईनाथ विठ्ठल साळुंखे, आशा निंबाळकर (सर्व रा. दरेवाडी, ता.नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे शेतात कंपाऊंडचे काम करत असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तुम्ही माझ्या शेतातील तारेचे कंपाऊंड का पाडले असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडयांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. पुढील तपास महिला पो.हे.कॉ. जयश्री फुंदे या करत आहेत.

मच्छिंद्र बेरड यांची स्टंटबाजी; पवन धूत
दरम्यान, या प्रकरणी जागा मालक पवन धूत यांनी त्यांचे वकील अ‍ॅड. पीयूष पुरोहित यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन बेरड यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. गट क्रमांक ७७ हे क्षेत्र ३१६ गुंठे आहे. यात पवन रामप्रसाद धूत, जगदीश रामविलास करवा, संतोष लहानू सूर्यवंशी यांची १८८ गुंठे जागा आहे. तसेच, स्नेहल विष्णू मोहिते यांची ८४ गुंठे जागा आहे. मच्छिंद्र भानुदास बेरड, उमेश बाबासाहेब जायभाय यांची एकत्रित २० गुंठे जागा आहे. बेरड व जायभाय यांच्या २० गुंठे क्षेत्राची चतु:सिमा निश्चित नव्हती. त्यामुळे मागील वर्षी मोहिते व बेरड यांच्यात करारनामा होऊन बेरड यांना २० गुंठे क्षेत्र निश्चित करून देण्यात आले. त्यानंतर इतर जागा मालकांमध्ये सदरची जागा विकसित करण्यासाठी हरिभाऊ खर्से यांच्याशी करार झाला. १० सप्टेंबर रोजी त्याचे काम सुरू झाले. त्यावेळी बेरड हे सर्वांबरोबर उपस्थित होते. बेरड यांना त्यांचे २० गुंठे क्षेत्र स्वतंत्र कंपाऊंड करून ताब्यातही देण्यात आले. तेव्हापासून काम सुरू असून यात कोठेही जागेचा वाद नाही, कोणीही कुणाच्या क्षेत्रात ताबा मारलेला नाही. बेरड यांनी समोरचे केवळ व्यापारी आहेत, त्यांच्याकडून जादा पैसे उकळण्यासाठी मोठ्या राजकीय व्यक्तीचे नाव घेऊन स्टंट केला, असा आरोप यावेळी धूत व अ‍ॅड. पुरोहित यांनी केला आहे. घटनेवेळी मी तेथे उपस्थित नव्हतो. घटनेप्रकरणी इतर भागीदारांशी बोलून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे धूत यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...