spot_img
ब्रेकिंगचार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राऊत यांनी एक्स (माजी ट्विटर) वर एक खळबळजनक पोस्ट शेअर करत दावा केला की, ‌‘शिवसेनेतून फुटलेले चार तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पक्ष सोडून गेले. यासोबतच त्यांनी गिरीश महाजन यांचा प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीसोबतचा फोटोही शेअर केला आहे.

या प्रकरणात चार मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ आयएसआय, आयपीएस अधिकारी, माजी व विद्यमान मंत्री आणि राजकीय नेते अडकले असल्याचा दावा करण्यात येत आहे. नाशिक येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे रॅकेट उघड झाल्याचा आरोप आहे. ठाणे क्राईम ब्रँचकडे तक्रारी दाखल झाल्या असून गोपनीय तपास सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याच प्रकरणात विधानसभेत 72 हून अधिक अधिकारी व माजी मंत्र्यांचा समावेश असलेला पेन ड्राईव्ह दाखवला होता.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनीही प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजन यांचा वर विश्वासू कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यात हनी ट्रॅप नाहीअसे स्पष्ट केले असले तरी, राऊत यांनी मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेतङ्घ असा आरोप करत, सीबीआय मार्फत चौकशी करून दूध का दूध, पानी का पानी करावे, असे आवाहन केले आहे. या आरोपांमुळे सत्ताधारी महायुती सरकार, विशेषतः भाजप व शिंदे गटावर ताण वाढला आहे. सध्या या प्रकरणावर राजकीय वतुर्ळात चर्चेची तीव्रता वाढली असून, शासनाकडून कोणती अधिकृत कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...