spot_img
महाराष्ट्रमाजी खासदार प्रसाद तनपुरे यांचा खा. नीलेश लंके यांना मोलाचा सल्ला, काय...

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचा खा. नीलेश लंके यांना मोलाचा सल्ला, काय म्हणाले पहा..

spot_img

नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करा
राहुरी / नगर सह्याद्री –
बलाढय शक्तींविरोधात लढून लोकसभा निवडणूकीत तुम्ही यश मिळविले असून आता नगर-पुणे रेल्वेमार्गासह नगर-मनमाड रस्त्याच्या कामासाठीही पुढाकार घ्या असा सल्ला मा. खा. प्रसाद तथा बापूसाहेब तनपुरे यांनी खा. नीलेश लंके यांना दिला.

लोकसभा निवडणूकीत विजय संपादन केल्यानंतर खा. लंके यांनी राहुरी येथील तनपुरे यांच्या फार्म हाऊसवर जात मा. खा. प्रसाद तनपुरे यांची भेट घेत आशिर्वाद घेतले. यावेळी तनपुरे कुटूंबियांच्या वतीने खा. लंके यांचा सत्कार करण्यात आला. राहुरी नगरपरिषदेच्या मा.नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, सोनाली तनपुरे, सोहम तनपुरे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी खासादर तनपुरे म्हणाले, संसदेमध्ये विविध आयुधांचा वापर करून आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी तनपुरे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीतील अनुभव खा. लंके यांच्याशी शेअर करीत पूर्वीच्या व सध्याच्या राजकारणामध्ये झालेल्या बदलाचीही त्यांनी तुलना केली.विखे कुटूंबासारख्या बलाढया शक्तीविरोधात तुम्ही लढत देऊन निवडणूक जिंकलात. यशाची ही घोडदौड अशीच सुरू ठेवा, तनपुरे परीवार आपल्या पाठीशी सदैव असेल अशी ग्वाही तनपुरे यांनी दिली.

नगर-मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीसंदर्भात आपण अलिकडेच मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे खा. लंके यांनी यावेळी सांगितले. पुढील आठवडयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मंत्री गडकरी यांनी बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत या रस्त्याच्या कामासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल असा विश्‍वास खा. लंके यांनी यावेळी व्यक्त केला. खा. लंके यांचे सहकारी तथा नांदूरपठारचे मा. उपसरपंच रविंद्र राजदेव यावेळी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...