spot_img
अहमदनगरएका वर्षांपासून लग्नाचं आमिष, तीन लॉजवर नेत अत्याचार! अल्पवयीन मुलीसोबत घडला धक्कादायक...

एका वर्षांपासून लग्नाचं आमिष, तीन लॉजवर नेत अत्याचार! अल्पवयीन मुलीसोबत घडला धक्कादायक प्रकार..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत लॉजवर घेऊन जात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तरूणाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अत्याचार, पोस्को, अ‍ॅट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील सुनील दळवी (रा. अरणगाव ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: फिर्यादी अल्पवयीन मुलीची निखीलसोबत ओळख झाली. त्याने तिला प्रेमाचे व लग्न करण्याचे आमिष दाखविले. निखील याने दुचाकीवरून फिर्यादी अल्पवयीन मुलीला कल्याण रस्त्यावरील जाधव मळा परिसरातील एका लॉजवर, नगर – पुणे महामार्गावरील चास (ता. नगर) शिवारातील एका लॉजवर व नगर –जामखेड रस्त्यावरील दरेवाडी शिवारातील एका लॉजवर नेले.

तेथे तिच्यासोबत इच्छेविरूध्द, बळजबरीने संबंध ठेवले. हा सर्वप्रकार नोव्हेंबर २०२३ (तारीख नाही) ते २८ जून २०२४ दरम्यान घडला. फिर्यादीने त्याच्याकडे लग्न करण्याबाबत इच्छा व्यक्त केली असता जातीवाचक बोलून तुझ्यासोबत लग्न करता येणार नाही असे म्हणून लग्न करण्यास नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...