spot_img
अहमदनगर'पाच' रुपये अनुदानाची घोषणा कागदावर! 'जाचक' अटींमुळे शेतकरी वंचित, पिळवणूक आता थांबणार...

‘पाच’ रुपये अनुदानाची घोषणा कागदावर! ‘जाचक’ अटींमुळे शेतकरी वंचित, पिळवणूक आता थांबणार का?

spot_img

शरद रसाळ / नगर सह्याद्री
शेतातील मालास भाव नाही तर दुसरीकडे पशुखाद्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. गाईच्या दुधाचा भाव उतरल्याने एक लिटर बाटली बंद पाण्याच्या दरापेक्षा कमी भावात दूध विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर ओढावली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची होत असलेली पिळवणूक आता थांबणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध उत्पादनाच्या प्रतिलिटर दुधाला ५ रूपये अनुदान जाहीर केले. याची मुदत ११ जानेवारी ते ११ फेब्रुवारी होती. मात्र फेब्रुवारी महीना संपत आला तरी अद्याप शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही. यादरम्यान दूध उत्पादक शेतकर्‍यांची माहिती ऑनलाईन भरण्यास सांगितली होती. बहुतेक सर्व दूध संकलन चालकांनी ही माहिती अपलोड केली. परंतु यामध्ये जाचक नियम व अटी असल्याने दूध उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप दुध उत्पादक शेतकर्‍यांमधून केला जात आहे.

गेली दोन वर्षे कोरोनासारख्या महामारीत शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. त्यामागून आलेली टाळेबंदी याचा फायदा उचलत बाजारात मागणी नसल्याचा कांगावा करत दुधाचे दर कमी करण्यात आले. प्रतिलिटर ४३ ते ४५ दराने विकले जाणारे गायीचे दूध आज २२ ते २५ रूपये प्रतिलिटर घालावे लागत आहे. मात्र, प्रत्यक्षात दुधाला प्रतिलिटर उत्पादन खर्चा एवढा देखील दर सध्या मिळत नाही.

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय तरूणांनी मोठ्या कष्टाने उभा केला आहे, बँक, पतसंस्था यांचे कर्ज घेऊन सुरू केलेला हा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच निसर्गाचा समतोल सुटल्याने कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, जनावरांचे औषध उपचारासाठी लागणारा मोठा खर्च, कुटुंब चालवणे, दुखणे, मुलांचे शिक्षण हे सर्व करत असताना दूध उत्पादक शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दुधाचे भाव पुन्हा दोन रुपयांनी घसरले
३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असणार्‍या गायीच्या दुधाला २३ ते २५ रुपये दर दिला जात आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती व विक्रीवर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. मात्र, प्राप्त परिस्थितीचा फायदा उचलत दूध संस्था दूध उत्पादक शेतकर्‍यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

१ लिटर दुधासाठी खर्च २५ रुपये, भाव २२ रुपये
जनावरांच्या खुराकाच्या वाढलेल्या किमती व चार्‍याचा विचार केला तर शेतकर्‍यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल २५ रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, हेच दूध सध्या २२ ते २५ रुपये दराने विकले जात असल्याने शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे जनावरांना लागणारा खुराक शेंगदाणा पेंड ५० किलोसाठी २८०० ते ३५००, कांडी पेंड १४०० तर १८००, सरकी पेंड १२०० ते १९०० तर भुसा ५० किलोसाठी १२०० ते १५०० रूपये दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोजावे लागतात. पशुखाद्यासह कडब्याच्या दरात वाढ झाल्याने आधीच संकटात सापडलेल्या दूध उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

पशुपालन व्यवसाय संकटात
दुधासह शेतमालाचे भाव घसरले असल्याने पशुपालक शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय संकटात सापडला असून दुधाचा भाव ४५ रुपयांवरून २२ रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. मात्र, दुसर्‍या बाजूने जनावरांसाठी आवश्यक पेंडी,भूसा याचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे दुग्ध व्यवसाय धोयात आलेला आहे. त्यात शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.
– सुरेश डोंगरे, दूध उत्पादक शेतकरी

पिळवणूक थांबवा
एक लिटर बिसलरीचे पाणी बनविण्यासाठी पॅकिंगसह तीन रुपये खर्च येतो. मात्र बाजारात बिसलरी २० रुपये लिटरने मिळते. एक लिटर दुधाला २५ रुपये उत्पादन खर्च येतो. मात्र, त्याचा दर २२ ते २५ रुपये मिळतो. हे अन्यायकारकच आहे. राज्य सरकारने प्रतिलिटर दुधाला ५ रूपये अनुदान जाहीर केले मात्र मुदत संपूनही अनुदान मिळाले नाही, दूध उत्पादक शेतकर्‍यांचा अंत न पहाता न्याय द्यावा.
– अविनाश पवार, मनसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजपच्या ‘बड्या’ नेत्याच्या सभेत राडा! कुठे घडाला प्रकार?

नांदेड | नगर सह्याद्री काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठा समजााच्या...

रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? शरद पवार नेमकं म्हणाले काय, पहा..

बारामती | नगर सह्याद्री वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत राम मंदिरात...

‘नगरकरांचे घर टू घर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन होणार’

अहमदनगर | नगर सह्याद्री- शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे १.४० लाख...

जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार विखेंची प्रचार सभेत मोठी ग्वाही, वाचा सविस्तर…

अहमदनगर | नगर सह्याद्री मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपुर निधी मिळाला...