spot_img
ब्रेकिंगअखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. १० डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील. कोणत्या नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार याची सविस्तर जिल्हानिहाय यादीदेखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५
अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५
आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५
निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५
मतदान – २ डिसेंबर २०२५
मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५

नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक आकडेवारी…
राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामधून ६,८४९ सदस्यांची व २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. यंदा १० नव्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तर, २३६ नगर परिषदांची मुदत संपली आहे. तसेच राज्यातील ४७ पैकी पाच नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. तर उर्वरित ४२ नगरपंचायतींची निवडणूक होणार आहे. यापैकी २७ नगर पंतायतींची मुदत संपली असून १५ नव्या नगरपंचायतींची यंदा भर पडली आहे.

एकूण जागा आणि आरक्षित जागा
निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदा- २४६
निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती- ४२
एकूण प्रभाग- ३८२०
एकूण जागा- ६८५९
महिलांसाठी जागा- ३४९२
अनुसूचित जातींसाठी जागा- ८९५
अनुसूचित जमातींसाठी जागा- ३३८
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- १८२१

मतदारांच्या मदतीसाठी निवडणूक आयोगाचे मोबाईल अॅप
दरम्यान, मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील सर्च सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव व मतदान केंद्र शोधता येईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. मात्र, त्याचबरोबर मोबाईल अॅपदेखील विकसित केल्याचं ते म्हणाले. त्याद्वारे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, उमेदवाराविषयी माहिती, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती, शिक्षणाविषयी, आर्थिक स्थितीविषयी मतदारांना माहिती मिळू शकेल.

उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा वाढवली!
या निवडणुकीत अ वर्ग नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख व सदस्यपदासाठी ५ लाखांची खर्चमर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग नगरपरिषदेसाठी हीच मर्यादा अनुक्रमे ११ लाख २५ हजार आणि ३ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. क वर्गासाठी हीच मर्यादा अनुक्रमे ७ लाख ५० हजार व २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. याशिवाय, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

१ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदान करणार!
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असून त्यासाठी सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे.

अहिल्यानगर- देवळाली- प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा (न.पं.) (न.पं.), पाथर्डी, राहाता, राहूरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर.

एकूण मतदार व मतदान केंद्र
पुरुष मतदार- ५३ लाख ७९ हजार ९३१
महिला मतदार- ५३ लाख २२ हजार ८७०
इतर मतदार- ७७५
एकूण मतदार- १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६
एकूण मतदान केंद्र- सुमारे १३ हजार ३५५

नगरपरिषद-नगरपंचायतींची जिल्हा व विभागनिहाय संख्या
कोकण विभाग एकूण- २७
पालघर- ४
रायगड- १०
रत्नागिरी- ७
सिंधुदूर्ग- ४
ठाणे- २

नाशिक विभाग एकूण- ४९
अहिल्यानगर- १२
धुळे- ४
जळगाव- १८
नंदूरबार- ४
नाशिक- ११

पुणे विभाग एकूण- ६०
कोल्हापूर- १३
पुणे- १७
सांगली- ८
सातारा- १०
सोलापूर- १२

छत्रपती संभाजीनगर एकूण- ५२
छत्रपती संभाजीनगर- ७
बीड- ६
धाराशिव- ८
हिंगोली- ३
जालना- ३
लातूर- ५
नांदेड- १३
परभणी- ७

अमरावती विभाग एकूण- ४५
अमरावती- १२
अकोला- ६
बुलढाणा- ११
वाशीम- ५
यवतमाळ- ११

नागपूर विभाग एकूण- ५५
भंडारा- ४
चंद्रपूर- ११
गडचिरोली- ३
गोंदिया- ४
नागपूर- २७
वर्धा- ६

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...

मतदार यादीच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय, कोणाचा फायदा, कोणाला झटका?

मुंबई / नगर सह्याद्री - एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची...