spot_img
ब्रेकिंगCorona Variant JN.1: धास्ती वाढली..! राज्यात पुन्हा कोरोना.., JN.1 व्हेरिएंटचे 'इतके' रुग्ण...

Corona Variant JN.1: धास्ती वाढली..! राज्यात पुन्हा कोरोना.., JN.1 व्हेरिएंटचे ‘इतके’ रुग्ण आढळले

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
Corona Variant JN.1: गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चे रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कोरोनाचे ५०० रुग्ण आढळले. तर गेल्या गेल्या २४ तासांत केरळमध्ये २९२, तामिळनाडू १३, महाराष्ट्र ११, कर्नाटक ९, तेलंगाणा आणि पुडुच्चेरीत ४ रुग्ण आढळले आहेत. दिल्ली आणि गुजरातमध्ये ३, पंजाब आणि गोव्यात १ रुग्ण आढळला आहेत.

कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यानंतर राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोरोना प्रतिबंध करणारे वर्तन करणे गरजेचे असल्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

या नवीन उपप्रकाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सरकारने सर्व जिल्ह्यांना दक्षात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व जिल्हे, पालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या मॉकड्रीलमध्ये सहभाग नोंदवला. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयू, सुविधा, यंत्रसामुग्री, ऑसिजन सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ, टेलीमेडिसीन सुविधा यांचा आढावा घेण्यात आला.

JN.1 व्हेरिएंट?

देशाच्या केरळमधील तिरुवनंतरपुरम जिल्ह्यातील काराकुलममध्ये ७८ वर्षीय महिलेमध्ये Corona JN.1 व्हेरिएंट आढळून आला होता. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट असलेल्या पिरोलापासून तयार झाल्याचे सांगण्यात आलं आहे.कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा या आधी कोरोना झाला आहे किंवा लस घेतलेल्यांनाही संक्रमण होण्याची शक्यता आहे. या कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, नाक गळणे, घसादुखी, गॅस्ट्रो, डोकेदुखी लक्षणे दिसून येतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...