spot_img
अहमदनगरनगर-मनमाड मार्गवर भीषण अपघात; पती-पत्नी ठार

नगर-मनमाड मार्गवर भीषण अपघात; पती-पत्नी ठार

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर-मनमाड राज्य मार्गावर कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पती-पत्नी ठार झाले आहे. दीपक गोविंद म्हसे, व पत्नी माया गोविंद म्हसे दोघे ( रा , ममदापुर, ता. राहता, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

सदरची घटना आज शुक्रवार दि. ११ रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. राहता तालुक्यातील ममदापुर येथील म्हसे दाम्पत्य मेव्हण्याच्या दशक्रिया विधीसाठी चार चाकी वाहनाने निघाले होते. दरम्यान नगर-मनमाड राज्य मार्गावरील राहुरी फॅक्टी येथील सेल पेट्रोल पंपाजवळ भरधाव मालवाहुक ट्रकने त्याच्या चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात म्हसे दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. तर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.अपघाताची बातमी समजताच स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त गाडीतुन मृतदेह बाहेर काढण्यात आले.

नगर-मनमाड रस्त्याचे काम धीम्या गतीने सुरु आहे. तसेच एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नगर मनमाड रस्त्याने पती-पत्नीचा बळी घेतला असून संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थनिक नागरिकांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनासाठी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...