spot_img
ब्रेकिंगनगरच्या शेतकऱ्यांनी 'या' पिकाच्या लागवडीतून महिन्यांमध्ये कमवले चार लाख

नगरच्या शेतकऱ्यांनी ‘या’ पिकाच्या लागवडीतून महिन्यांमध्ये कमवले चार लाख

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथील प्रगतशील शेतकरी आबासाहेब विनायक लोखंडे हे मागील सात ते आठ वर्षांपासून दरवर्षी शेतामध्ये खरबूज या वेलवर्गीय फळ पिकाची लागवड करत आहेत.

वडिलोपार्जित शेतीमध्ये ते दरवर्षी ऊस,हरभरा, कांदा, अशा विविध पिकांची लागवड करत आहेत. दरवर्षी साधारण दोन टप्प्यात खरबूज लागवडीचे नियोजन असते. पाण्याची बचत करत त्यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खरबूज पिकाचे चांगले उत्पन्न मिळवले आहे. याशिवाय काही शेतकरी भाजीपाला उत्पादनावर देखील भर देत आहेत.

मात्र खरबूज पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने खरबूज लागवड करणे तितके सोपे नसून, परंतु आबासाहेब विनायक लोखंडे यांनी मागील सात ते आठ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या खरबुजाच्या लागवडीत प्रयोगशीलता जपत सातत्य राखले आहे.

दरवर्षी पाच एकर शेतीमध्ये खरबुजाची लागवड करत असतात. परंतु यावर्षी पाण्याअभावी दुष्काळी परिस्थिती असताना त्यांनी एक एकर खरबुजाची लागवड केली. कोणत्याही पद्धतीचे कीटकनाशके व रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी तीन महिन्यांमध्ये चार लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

२०१७ ते २०१८ च्या दरम्यान आबासाहेब लोखंडे यांचा खरबूज पिकाकडे कल वाढला. घुगलवडगाव शिवारामध्ये त्यांनी खरबूज फळ पिकाची प्रथम लागवड केली. लोखंडे यांनी पहिल्या टप्प्यात अर्ध्या एकर मध्ये लागवड करण्याचे ठरविले. सध्या ते दरवर्षी एक ते दोन टप्प्यांमध्ये खरबूज लागवड करत आहेत. अर्ध्या एकर पासून सुरुवात केलेली खरबूज लागवड आज पाच एकरपर्यंत लोखंडे यांनी वाढवली होती परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी त्यांनी एक एकर खरबुजाची लागवड केली. यंदाच्या हंगामात एकरी सरासरी १६ ते १८ टन उत्पादन मिळाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...

जिहादी हल्ल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या!; आ.संग्राम जगताप

कोल्हापूरमधील कानवड येथे हिंदू जन आक्रोश मोर्चात आवाहन कोल्हापूर ।नगर सहयाद्री:- जिहादी वृत्तीने हिंदूंवर केलेले...

लोडींग ट्रक क्षणात रिव्हर्स; पाच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, नगरमध्ये अपघात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगरजवळील निंबळक-विळद बायपास रस्त्यावर शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेत पाच वर्षीय...