spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: भर रस्त्यात टोळक्याने घेरले, तरुणासोबत नको तेच घडले

Ahmednagar Crime: भर रस्त्यात टोळक्याने घेरले, तरुणासोबत नको तेच घडले

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर शिवारात एका तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल सोमवारी सायंकाळी घडली. पुष्कर शेलार (पूर्ण नाव नाही) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती असून जखमी तरुणाचा जबाब नोंदविल्यानंतर हल्ल्याचे कारण समोर येईल असे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी सांगितले.

शेलार व स्थानिक तरुणाचे यापूर्वी वाद झाले असल्याची माहिती समजली. याच वादातून काही तरुणांनी शेलार यांना सोमवारी सायंकाळी बुर्‍हाणनगर- भिंगार रस्त्यावर गाठले. तेथे त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले असून स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान घटनेची माहिती मिळतात राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय धाव घेतली होती. जखमी तरुणाचा जबाब नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सहायक निरीक्षक राजगुरू यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...