spot_img
अहमदनगरआ. संग्राम जगतापांविरोधात खोटी बातमी, सातपुतेंसह निखिल वागळेंवर गुन्हा

आ. संग्राम जगतापांविरोधात खोटी बातमी, सातपुतेंसह निखिल वागळेंवर गुन्हा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : राहुरी येथील आढाव वकील पती-पत्नीच्या हत्येमध्ये अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा हात असल्याची बातमी काही युट्युब चॅनेल वरून प्रसारित करण्यात आली होती. मात्र याबाबत आता थेट राहुरी पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला असून ज्या प्रकरणाचा आणि आमदार संग्राम जगताप यांचा काहीही संबंध नाही. या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी अटक झाले असून खून हा खंडणीच्या कारणातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व सराईत गुन्हेगार आहेत अशी माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे.

एका युट्युब चॅनलच्या माध्यमातून निखिल वागळे नामक पत्रकाराने थेट आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा या खुनामध्ये हात असल्याचा आरोप केल्याने अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात निखिल वागळे तसेच शिवसेना केडगाव फेसबुक चालवणारे सुनील सातपुते यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅड राजाराम आढाव आणि अॅड मनीषा आढाव यांचे २५ जानेवारी रोजी राहुरी न्यायालयातून सिनेस्टाईल अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती. या हत्याकांडांचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. त्याच अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपल्या यु टूब चॅनेवर स्थानिक नागरिकांचा हवाला देत सदर हत्याकांडातील टोळी ही अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी संमधीत टोळी आहे अन् ही टोळी अजित दादा यांच्याशीही संबंधित असल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी माञ या वक्तव्याचे खंडण करत यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा विकृत प्रवृत्तीचा असून केवळ खंडणीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. टोळीतील आरोपी सागर खांदे, शुभम महाडिक,हर्षल ढोकणे,बबन मोरे हे सर्व राहुरी तालुक्यातील असून आ. संग्राम जगताप यांच्याशी त्यांचा कुठलाही संबंध तपासात आढळून आलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...