spot_img
महाराष्ट्ररेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पिळवणूक, शेतकरी आक्रमक ! खा. सुजय विखेंपुढे वाचला तक्रारींचा पाढा

रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पिळवणूक, शेतकरी आक्रमक ! खा. सुजय विखेंपुढे वाचला तक्रारींचा पाढा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : इंग्रज काळापासून रेल्वे लाईनच्या खालून पाटपाणी नेण्यासाठी असलेल्या मोऱ्या बंद करत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक सुरु आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे असा आरोप करत केंद्र सरकार स्तरावर हा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे केली. सारोळा कासार येथील शेतकऱ्यांनी खा. विखे यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिलेही उपस्थित होते.

या संदर्भात सारोळा कासार (ता. नगर) येथील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सारोळा कासार परिसरातून इंग्रज काळात रेल्वे लाईन गेलेली आहे. ज्या वेळेस रेल्वे लाईनचे काम झाले त्यावेळी रेल्वे प्रशासनाने ए, बी, सी क्लास अशा तिन प्रकारामध्ये जमीन अधिग्रहण केली.

ज्या वेळी रेल्वे लाईन झाली त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांच्या एका जमिनीचे दोन भाग झालेले आहेत. त्यामुळे एका जमिनीच्या एका भागातून दुसऱ्या भागात पाटपाणी नेण्यासाठी मोऱ्या तयार करुन दिलेल्या आहेत. या मोऱ्या नं. ३३३ व ३३४ मधून शेतकरी वर्षानुवर्षे पाटपाणी नेत होते. परंतु गेल्या आठ दहा वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने पाटपाणी किंवा पाईपलाईनने पाणी नेण्यासाठी बंदी घातलेली आहे.

वास्तविक परिस्थिती अशी आहे की, शेतकऱ्यांच्या एका जमिनीचे दोन भाग रेल्वे मुळे झालेले आहेत. इंग्रज काळापासून पाटपाणी एका मळ्यामधून दुसऱ्या मळ्यात नेण्यासाठी कधीही अडवणूक झाली नाही. पण सध्याच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी मुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे.

पाईपलाईन नेण्यासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक मागणीही केली जात आहे. तसेच गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हीच परिस्थिती सर्वच रेल्वे लाईनच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांची असून हा प्रश्न केंद्र सरकार स्तरावर मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

याशिवाय सारोळा अस्तगाव या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी जुन्या दिंडी रस्त्यावर रेल्वे लाईन क्रॉस करण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी प्रविण काळे, गणेश काळे, सुभाष काळे, संजय धामणे, संजय काळे, श्रीरंग धामणे, मच्छिंद्र काळे, पोपट धामणे, ज्ञानदेव काळे, पांडुरंग काळे, अविनाश धामणे, मोहन काळे, संतोष काळे, बाबासाहेब धामणे, एकनाथ धामणे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता कशासाठी थांबायचे?; पक्ष सोडण्यावर नगरसेवक, पदाधिकारी ठाम

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीवेळी वारंवार मागणी करूनही पक्षाच्या वरिष्ठांनी, नेतृत्वाने आमची दाखल घेतली...

गरीब विक्रेत्यांना लक्ष्य करू नका; खा. नीलेश लंके यांचा इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहरात महानगरपालिका अतिक्रमण मोहीम राबवत असून, रस्त्याच्या कडेला फळविक्री करणारे, हातगाडीवाले,...

निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही; आमदार दातेंचा ठेकेदाराला इशारा

पारनेर | नगर सह्याद्री:- पारनेर जामगांव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट...

दिल्ली विधानसभेचा बिगुल वाजला; ५ फेब्रुवारीला मतदान अन निकाल…

निवडणूक आयुक्तांची घोषणा नवी दिल्ली / वृत्तसंस्था : नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते आहे. दिल्लीत...