अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शिवाजीनगर येथील सांस्कृतिक भवन मागे एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सुरेखा श्याम निमसे (वय 36 रा. ढवणवस्ती, सावेडी) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवाजीनगर येथील सांस्कृतिक भवन मागे एक महिला बेशुध्द अवस्थेत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेला उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता तेथील डॉ. बटोळे यांनी तपासणी करून महिला मयत झाल्याचे घोषीत केले.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे करत आहे.