News: राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप नेत्याला दिवसाढवळ्या गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद यादव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या.
हल्लेखोरांनी प्रमोद यादव यांच्यावर गुरुवारी सकाळी तीन गोळ्या झाडल्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या प्रमोद यादव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे.