spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगरमध्ये खळबळ! शालेय विद्यार्थ्यांसोबत घडलं भयंकर; अंगावर काटा आणणारी घटना...

अहिल्यानगरमध्ये खळबळ! शालेय विद्यार्थ्यांसोबत घडलं भयंकर; अंगावर काटा आणणारी घटना…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील एका विद्यार्थ्यांचे सकाळी अपहरण करून दुपारी मढेवडगाव येथील जंगलात सोडून दिल्याचा प्रकार घडला. शुभम घुटे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. अपहरण नाट्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरची घटना मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजलेच्या सुमारास घडली. अपहरण झालेला विद्यार्थी शुभम घुटे हा विद्यार्थी पूर्णतः घाबरलेल्या अवस्थेत मढेवडगव येथे आढळला. यावेळी त्यांनी सदरच्या प्रकरणाबाबत माहिती दिली.

नेहमीप्रमाणे सुरेगाव येथील श्री श्रीधर स्वामी विद्यालयात शिक्षणासाठी शुभम जात असतो. दररोज शाळेत जाण्यापूर्वी सुरेगाव येथील स्वामी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतो. मंगळवार दि.२६ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे स्वामींचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर अज्ञात दोन ते तीन व्यक्ती चार चाकी वाहनातून उतरले. त्यामधील एका जणांनी तोंडावर रुमाल टाकला त्यानंतर बेशुद्ध पडल्याचे सांगितले. शुद्धीवर आल्यानंतर नंतर त्यांनी मढेवडगाव येथील आदिरा हॉटेल समोरील जंगलात बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले. त्यानंतर काहीच कळेना असे झाले.

त्यानंतर अनेकांनी माझी विचारपूस केल्यानंतर माझे काही नातेवाईक तेथे आले. अशी माहिती अपहरण झालेल्या विद्यर्थ्यांनी दिली. त्यानंतर सदर अपहरणाचे कोडे उलगडले. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरण नाट्यामुळे वाडी वस्तीवरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपहरणाचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्ष राहून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे....

घरात घुसून महिलेसोबत ‘तसले’ वर्तन; रावसाहेबवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अहिल्यानगर | नगर सह्याद्री गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे....

‘पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ४.४३ कोटींचा नफा’

संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर...