पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर पंचायत समिती मध्ये प्रशासकीय कामासाठी येणार्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे या करिता पंचायत समिती कडून वॉटर फिल्टर सुविधा करण्यात आली आहे. मात्र हे वॉटर फिल्टर बरेच दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्याची असुविधा निर्माण झाली आहे.
पारनेर पंचायत समिती हे तालुयांतील अत्यंत वर्दळीचे प्रशासकीय कार्यालय आहेत. या समितीमध्ये वेगवेगळ्या विभागाचे अनेक कार्यालय आहेत. त्या कार्यालय मध्ये तालुयातील बहुतांश नागरिक प्रशासकीय कामासाठी कायमच येत असतात. या आलेल्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे म्हणुन पंचायत समिती आवारात एक वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहे. परंतु पंचायत समितीच्या अनस्थेमुळे वॉटर फिल्टर बरेच दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. वॉटर फिल्टर धूळखात पडला आहे. त्यात एक टिपकाही पाणी नाही.नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणुन पारनेर पंचायत समिती प्रशासनाने तात्काळ या समस्येची दखल घेउन बंद अवस्थेत असलेला वॉटर फिल्टर सूरू करण्याची मागणी होत आहे.