spot_img
अहमदनगरउद्योजकांचा आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा, काय म्हणाले संग्राम जगताप पहा

उद्योजकांचा आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा, काय म्हणाले संग्राम जगताप पहा

spot_img

आमी संघटनेतील सभासदांशी आमदार संग्राम जगताप यांचे चर्चासत्र संपन्न
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
शहरामध्ये विविध विकास कामाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यात यशस्वी झालो आहे. या कामांसाठी वर्षानुवर्ष पाठपुरावा केला असल्यामुळे प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे. निवडणुकीमध्ये कुठलेही काम सुरू झाले नसून दोन वर्षांपूर्वीच कन्सल्टिंग एजन्सी नेमून प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आणि तो मंजूर देखील झाला. त्यानंतर लोकसभा आणि विधान परिषदेची आचारसंहिता लागली, आता फक्त ६ रस्त्यांची कामे सुरू झाली आहे दिवाळीनंतर शहरात विविध भागात रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे मार्गी लागणार आहे. दहा वर्षांमध्ये केलेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम करत आहे. नगर एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी ६०० एकर जागा उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी मोठमोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, त्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होईल, सुरक्षित शहर म्हणून ओळख निर्माण झाली असल्यामुळे बाहेरील शहरामधील बांधकाम व्यावसायिक येत असून कोठे प्रकल्प उभे राहत आहे सह्याद्री नागापूर चौक येथे उड्डाणपुलाचे काम होणार असून डीएसपी चौक येथे कामदेखील सुरू झाले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

एमआयडीसी मधील आमी संघटनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयदार्य खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, अरविंद पारगावकर, सुनील मुनोत, सुमित लोढा, सागर निंबाळकर, राजेंद्र कटारिया, दिलीप अकोलकर, राजेंद्र सुक्रे, नरेंद्र बाफना, गौरव गंधे, अमित पानसरे, सतीश गवळी, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, हरजीतसिंह वधवा, सुमित सोनवणे, निनाद टिपूगडे, मिलिंद कुलकर्णी, दौलतराव शिंदे, दिलीप कर्नावट, अनिल लोढा, किरण कातोरे, रवी बक्षी, सुभाष गुगळे, अदीसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अरविंद पारगावकर म्हणाले की, शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामामुळे आम्ही सर्व उद्योजक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शहराला महानगराचे रूप देण्यासाठी तुम्ही काम करत आहात, नगर एमआयडीसीमध्ये एक मोठा उद्योग आणावा, जेणेकरून या ठिकाणी १० हजार युवकांना रोजगार मिळेल त्या माध्यमातून शहराच्या अर्थकारणाला बळ मिळेल उद्योजकांच्या काही समस्या असतात त्या सोडविण्याचे काम तुम्ही करतच आहात, नगरमध्ये आता उद्योग येण्यासाठी तयार आहेत त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असे ते म्हणाले.

जयदार्य खाकाळ म्हणाले की, पुणे मुंबई येथील कंपन्यांमध्ये ठेके घेण्यासाठी राजकीय लोकांचा दबाव येत असतो मात्र तो आपल्याला नाही उलट त्रास देणाऱ्यांनाच सरळ केलं जातं. आमदार संग्राम जगताप नेहमीच उद्योजकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना आमी संघटनेचा पाठिंबा आहे असे ते म्हणाले.
हरजीत वधवा म्हणले की, एमआयडीसीतील बंद पडलेली आयटी पार्कची बिल्डिंग धुळखात पडली होती काचा फुटल्या होत्या या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नामुळे छोट्याशा प्रमाणात का होईना आयटी पार्क सुरू झाले आहे नगर एमआयडीसी मध्ये एखादी सरकारी कंपनी आणावी तसेच सरकारी मेडिकल कॉलेज देखील पाहिजेल यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असे ते म्हणाले.
मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, आपल्या शहराचे काम करणारे लोक कोण आहे त्यांच्याकडे कोणत्या कल्पना आहे हे आपण पाहिले आहे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे व्यापक दृष्टिकोन आहे आणि शहराबद्दल असणारी तळमळ आपुलकी देखील आहे त्यांचे काम आपल्या सर्वांना दिसत असून आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत असे ते म्हणाले.

आयटी पार्क येथे मोठा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील
एमआयडीसीतील आयटी पार्क इमारत 2000 साली माजी उद्योग मंत्री कै. पतंगराव कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तेव्हापासून 19 वर्ष बिल्डिंग ओसाड पडली होती. या ठिकाणी मोठमोठे आगेमोहोळ तसेच फुटलेल्या काचा पहावयास मिळत होते. मी या गोष्टीकडे लक्ष घातले आणि इमारतीला पुन्हा एकदा आयटी पार्कचे रूप दिले आणि या ठिकाणी छोटेसे प्रमाणात का होईना काम सुरू झाले असून तीनशे युवक युवती काम करत आहे. ते काम बंद पाडण्यासाठी काही स्वयंघोषित लोक पुढे येत आहे. प्रत्येक जण शून्यातूनच काम सुरू करत असतात मधल्या काळात आयटी पार्क क्षेत्रावर कोविडचे मोठे संकट ओढावले होते. आजही काही लोक वर्क फॉर्म होम काम करत आहे. माझा प्रयत्न सुरू असून या ठिकाणी एक चांगला मोठा प्रकल्प आणायचा आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल; वाहतुकीत मोठा बदल, वाचा अपडेट

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या...

शहरातील लॉजवर प्रेमाचा भयंकर शेवट; बॉयफ्रेंडच्या कृर्त्याने शहर हादरलं

Crime News: एका लॉजवर महिलेची हत्या तिच्याच बॉयफ्रेंडने केली असल्याचे उघड झाले आहे. आरोपीने...

सावध राहा! भांडी स्वच्छ करण्याच्या नावाखाली सोनं पळवलं; नगर मधील धक्कादायक प्रकार ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर मधील वसंत टेकडी, सावेडी येथे दोन अनोळखी इसमांनी एका 78...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा एका क्लिकवर..

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आर्थिक रूपात...