spot_img
अहमदनगरखळबळजनक! व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, तलाठी, मंडलाधिकारी यांच्यासह १२ जणांवर गुन्हे दाखल, नेमकं...

खळबळजनक! व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, तलाठी, मंडलाधिकारी यांच्यासह १२ जणांवर गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
निंबळक (ता. नगर) येथील आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबाच्या मालकीची जमीन परस्पर खरेदी करून लाटल्यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी नगरमधील व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, मंडलाधिकारी, तलाठी दुय्यम निबंधक अशा एकूण १२ जणांविरुद्ध फसवणूक व ट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक संपत भोसले यांनी दिली.

यासंदर्भात सिंधुबाई मुरलीधर निकम (७०, निंबळक, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सिंधुबाई निकम यांनी प्रथम न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने फौजदारी दंड संहिता कलम १५६ (३) अन्वये पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

दिनेश भगवानदास छाब्रिया (सावेडी, नगर), सरला भगवानदास छाब्रिया (सावेडी, नगर), शिवाजीराव आनंदराव शेळके (कारेगाव, कर्जत, नगर), आशिष रमेश पोखरणा (सर्जेपुरा, नगर), जयवंत शिवाजीराव फाळके (कर्जत), आकाश राजकुमार गुरुनानी (हरदेवनगर, संत निरंकारी भवनमागे, सावेडी, नगर), माणिक आनंदराव पलांडे (पिंपळे रस्ता, मुखाई, पुणे), अजय रमेश पोखरणा (सर्जेपुरा, नगर), गौतम विजय बोरा (कापड बाजार, नगर), नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया (शोभासदन, छत्रपती संभाजीनगर रस्ता, डीएसपी चौक, नगर), कामगार तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे (निंबळक, नगर) मंडलाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय (नागपूर, नगर) व सहायक दुय्यम निबंधक, वर्ग दोन (नगर) या बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

निंबळक येथील गट क्रमांक ४०/२/३ मधील ५ हेटर ९८ आर व गट क्रमांक ४९/१/२ मधील २ हेटर ८५ आर मिळकत शिवाजी फाळके, दिनेश छाबरिया तसेच माणिक पलांडे, दिनेश छाबरिया, जयवंत फाळके यांनी आपण व आपल्या कुटुंबीयांच्या अशिक्षित, अडाणीपणाचा, वयोवृद्धपणाचा गैरफायदा घेऊन कोर्‍या कागदावर व स्टॅम्पवर, इतर दस्तांवर सह्या, अंगठा घेऊन तत्कालीन सरकारी अधिकार्‍यांशी हातमिळवणी करत इतर हक्कात असलेल्या ’आदिवासी मिळकत हस्तांतरणास बंदी’ असा शेरा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता बेकायदा हटवून, मिळकत कगदोपत्री बेकायदा खरेदी करून घेतली तसेच ही मिळकत पुन्हा नव्याने अजय पोखरणा, गौतम बोरा, नरेंद्र फिरोदिया व इतर आरोपींना २१ जून २०२३ रोजी दस्तक्रमांक ४०४७, ४०४८ व ४०४९ अन्वये कटकारस्थान करून बेकायदा नोंदवून मला व कुटुंबाला भूमीहीन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...