नगर सहयाद्री टीम-
सध्याच्या ‘हेल्थ कँशस’च्या काळात प्रोटीनची गरज भागवण्यासाठी अनेकांचा मांसाहार आणि ‘सप्लिमेंट फूड’वर भर असतो. मात्र, संशोधकांनी आता आधीच्या मक्याच्या तुलनेत २५० टक्के जास्त प्रोटीन असलेल्या मक्याचे वाण शोधले आहे. संशोधकांचा दावा आहे की हा मका मांसाहार आणि सप्लिमेंट फूडमधील प्रोटीनची भरपाई करतो. या मक्यातून प्रोटीनसोबत कार्बोहायड्रेड, फायबर आणि व्हिटॅमिन्स देखील मिळतात.
सप्लिमेंटपासून सुटका
अनेकजण ‘बॉडीबिल्डिंग’च्या नादात सप्लिमेटचा वापर करातात, मात्र बरेचवेळा त्याचे अत्यंत दुष्परिणाम होतात. या नव्या मक्यामुळे अशा लोकांची सप्लिमेंटपासून कायमची सुटका होऊ शकते. या मक्यातून पुरेसे प्रोटीन मिळणार आहे. त्यामुळे प्रटीनसाठी सप्लिमेटची गरज पडणार नाही.
शाकाहारींसाठी उत्तम पर्याय
शाकाहारामुळे अनेकांच्या भोजनात प्रोटीनचे प्रमाण कमी आढळते. त्याच्यासाठीही हा मका सकस पर्यय ठरणार आहे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि कॅल्शियम वाढवण्यास मदत होणार आहे. त्यासाठी औषध घेण्याची गरज पडणार नाही. डायबेटीस सारख्या समस्या टाळण्यासाठीही मक्याचा हा नवा वाण रामबाण ठरणार आहे.