spot_img
ब्रेकिंग..तर ठरलं! अखेर महायुतीचा तिढा सुटला, जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा? मनसेला मिळणार..

..तर ठरलं! अखेर महायुतीचा तिढा सुटला, जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा? मनसेला मिळणार..

spot_img

Lok Sabha Election 2024 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दिल्लीत महायुतीची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्याची झाल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीच्या जागावाटपाबाबत तिन्ही पक्षातील नेत्यांना प्रश्न पडला होता. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे देखील महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू झाल्या. मनसे महायुतीसोबत आल्यास त्यांना किती जागा मिळणार? याकडे देखील अनेकांचं लक्ष लागून होते.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (ता. २३) रात्री दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. बैठकमध्ये भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या ३० जागा मिळणार आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटाला १३ जागा, अजित पवार गटाला ४ जागा आणि राज ठाकरे यांच्या मनसेला १ जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेला दक्षिण मुंबईतील जागा मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. बैठकीतील महत्वाची बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ५ ते ६ जागांवर नवीन उमेदवार देण्यात यावेत, अशी चर्चाही झाली आहे. त्यामुळे शिंदे गटातून नेमकं कुणाचं तिकीट कापलं जाणार? याकडेही सर्वाचं लक्ष लागलं असून आज भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...