spot_img
अहमदनगरडॉ. विखे पाटील यांना निवडून आणण्याची तन-मन-धनाने काम करणार: चौधरी

डॉ. विखे पाटील यांना निवडून आणण्याची तन-मन-धनाने काम करणार: चौधरी

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याची सर्वच पदाधिकारी तन-मन-धनाने काम करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी प्रचार नियोजनाच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना केले आहे.

महायुती अहिल्यानगर दक्षिण जिल्हा व शहर जिल्हा पदाधिकारी प्रबंधन व कोअर कमिटीची डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचार नियोजनाच्या बैठकी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडली.

यावेळी जिल्हाअध्यक्ष ॲड. अभय आगरकर, बाबासाहेब वाकळे, प्रा. भानुदास बेरड, प्रशांत मुथा, नितीन शेलार, सदाशिव देवगावकर, सुनील रामदासी, भैय्या गंधे, प्रिया जानवे, सचिन पारखी, प्रशांत मुथ्था, महेश नामदे आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे विजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

चौधरी म्हणाले, महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याची भाजपा मोर्चा आघाडीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने काम करणार आहेत. माननीय पंतप्रधान मोदी यांचे नमस्कार पत्र मोदी परिवार स्टिकर्स या माध्यमातून तसेच समाज घटकांशी पदाधिकारी संवाद साधणार आहेत.

५१% बुथवरची लढाई जिंकण्याची जबाबदारी दिली आहे. प्रत्येक घराघरात संपर्क साधला जाणार आहे. प्रत्येक जण रोज किमान आठ तास पक्ष व देशासाठी वेळ देणार आहे. मोदींना तिसऱ्यांदा विश्वनेता तसेच भारताला विश्व गुरु होण्याकरिता प्रत्येक जण तन-मन-धनाने यात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...