spot_img
अहमदनगर'भीम उत्सव कार्यक्रमात धुडगूस घालणार्‍यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा'

‘भीम उत्सव कार्यक्रमात धुडगूस घालणार्‍यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आला. नील क्रांती चौक येथे कार्यक्रम चालू असताना काही व्यक्तींनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन शिवीगाळ करत खुर्च्या फेकून मारहाण केली. कार्यक्रमामध्ये धुडगूस घालणार्‍यांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी समस्त आंबेडकरी जनतेच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

कार्यक्रमा दरम्यान पठारे नामक व्यक्तीला नीलक्रांती चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. पठारे हा अट्टल गुन्हेगार असून मोयाच्या गुन्ह्यातून पेरोल वरती जामिनावर बाहेर आहे. त्याच्यावर पुन्हा मोया अंतर्गत कारवाई करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नील क्रांती चौक मित्र मंडळाच्या निर्दोष कार्यकर्त्यांवर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा.

अशी मागणी पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडे केली आहे. यावेळी आंबेडकरी चळवळीचे अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, सुनील शेत्रे, बंडू आव्हाड, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, सुशांत महस्के, प्रतीक बारसे, संजय जगताप, विशाल गायकवाड, योगेश साठे, जयाताई गायकवाड, गणेश गायकवाड, प्रमोद पडागळे, महेश भोसले, पवन भिंगारदिवे, जय कदम, वैभव कांबळे, संदीप वाकचौरे, विशाल भिंगारदिवे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...