spot_img
ब्रेकिंगडॉ. सुजय विखे पाटलांचा 'या' गावात जनता दरबार; नागरिकांना दिली मोठी ग्वाही,...

डॉ. सुजय विखे पाटलांचा ‘या’ गावात जनता दरबार; नागरिकांना दिली मोठी ग्वाही, ‘आता….’

spot_img

Politics News: लोणी खडकेवाके( ता. राहाता ) येथील फूड टेक्नॉलॉजी कॉलेज येथे डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी आपापल्या समस्या मांडत त्यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी केली.

दरबाराच्या प्रारंभी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या विविध अडचणी व प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतले आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची योग्य ती दखल घेतली जाईल, तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही देखील दिली.

सदरील जनता दरबारात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण अशा विविध क्षेत्रातील प्रश्नांवर भर देण्यात आला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासनाशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपली भूमिका सकारात्मक राहील, असेही आश्वासन या दरम्यान उपस्थितांना दिले. या जनता दरबारामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुंबईवरुन फोन खणाणला!, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ‘या’ खात्याची जबाबदारी

Politics News Today: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी...

नव्या कारभाऱ्यांनो, ऐका सावध हाका!

जिल्ह्याचा गाडा आता नव्या दमाच्या अधिकाऱ्यांच्या हाती | जिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ आता जिल्हा परिषद सीइओ अन्‌‍‍...

आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी आयुक्तांना धाडले पत्र; केली मोठी मागणी, ‘निलंबन काळात…’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल हा अर्धवट असल्याबाबत त्रिसदस्यीय समितीने अस्वीकृती प्रमाणपत्राच्या...

अवकाळीने जिल्ह्यात दाणादाण; ‘या’ गावातील दुकानावर पडले झाड!, मोठी नुकसान..

कर्जत । नगर सहयाद्री कर्जत तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. तालुक्यात सलग तीन...