spot_img
राजकारण'सरकारला मनोज जरांगेंचे नेतृत्व संपवून अण्णा हजारे करायचा आहे का?'

‘सरकारला मनोज जरांगेंचे नेतृत्व संपवून अण्णा हजारे करायचा आहे का?’

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई : Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर आंदोलने सुरु होती. परंतु सरकारच्या आवाहनानंतर व शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर त्यांनी काल आंदोलन मागे घेतले.

परंतु ठाकरे गटाने राज्य सरकारकडे 10 प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारला मनोज जरांगेंचे नेतृत्व संपवून अण्णा हजारे करायचा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाचा पेच सुटणे महत्वाचे आहे.

2 जानेवारीनंतर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही जरांगे पाटलांची मागणी आता मान्य झाली आहे. परंतु कुणबी प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण नसून त्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. तसेच ठाकरे गटाने राज्य सरकारला 10 प्रश्न केले असून, या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत असे म्हटले आहे.

– शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार नेहमीच म्हणत आले की, आमच्या मागे महाशक्ती आहे. ही महाशक्ती महाराष्ट्र पेटला असताना झोपली होती काय?
– देवेंद्र फडणवीस निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीस गेले. तेथे नरेंद्र मोदी व अमित शाह होते. फडणवीस यांनी जरांगे-पाटलांचे उपोषण व महाराष्ट्राच्या स्थितीवर पंतप्रधानांशी चर्चा केली काय?

– भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेला चूड लावायची आहे काय? मराठा समाज विरुद्ध ‘ओबीसी’ असा झगडा त्यांना पेटवायचा आहे काय?
– सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा. सगळे ठीक होईल. याचा अर्थ काय? मराठा आरक्षणापासून फडणवीस स्वतःला लांब का ठेवत आहेत?

– मनोज जरांगे-पाटील हा फाटका फकीर माणूस असून त्याच्या रक्तात स्वार्थ नाही. त्यामुळे दबाव व खोक्यांनी तो विकत घेता येणार नाही. हीच सरकारची समस्या आहे काय?
– मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून घटनादुरुस्ती करणे गरजेचे आहे. विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्यापि का केली नाही? व आता तरी ते विशेष अधिवेशन घेतील काय?

– मनोज जरांगे-पाटील यांना दिल्लीत नेऊन पंतप्रधानांशी चर्चा का घडवली गेली नाही?
– गुजरातमधील ‘पटेल’ आंदोलनाप्रमाणे महाराष्ट्रातील ‘मराठा’ आंदोलन चिरडून टाकायची योजना आहे काय?

– शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर वर्षभर लांबवले, तसे मराठ्यांचे आंदोलन सरकारला लांबवत ठेवायचे राजकारण आहे काय?
– सरकारला जरांगे-पाटलांचे नेतृत्त्व संपवून त्यांचा अण्णा हजारे करायचा आहे काय?

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...