श्रीगोंदा / नगर सह्याद्री-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्या अंतर्गत आज न्यू इंग्लिश स्कूल, चापडगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, प्रवीणदादा घुले पाटील (जि.प. सदस्य), प्रकाश शिंदे (उपसभापती), आशोक खेडकर (जि.प. सदस्य), आबासाहेब भिकाजी घनवट, परमेश्वर घनवट, आनिल गदादे, संतोष निबाळकर, बापुराव भंडारे, विजय भोसले, विश्वास शिंदे, स्वप्निल तोरडमल, गणेश काळदाते, अण्णा मेहत्रे, संभाजी चव्हाण, दिपक सोनवणे, दादा सोनवणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना मान्यवरांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमामुळे समाजात सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ झाली असून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.