spot_img
ब्रेकिंगसुखी संसारावर विरझण! पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

सुखी संसारावर विरझण! पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

spot_img

सोलापूर। नगर सह्याद्री-
सोलापूरमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. वीस वर्षांपूर्वीची बांधलेली पाण्याची टाकी कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून काही दिवसापूर्वीच लग्न झालेल्या तरुणांच्या सुखी संसारावर विरझण पडले आहे. सद्दाम नदाफ असं मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त: सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बबलादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बबलादमध्ये ४० हजार लिटरची सार्वजनिक पाण्याची टाकी २० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. बरीच जुनी झाल्याने टाकी गळत देखील होती. टाकीच्या दुरूस्तीसाठी जलजीवन मिशन योजनेतून कामही सुरू करण्यात आले होते.

दरम्यान टाकीचे काम सुरु असतांना कॉलम कट करत असताना टाकी कोसळली. यावेळी तरुण टाकीखाली उभा असलयामुळे तो जागीच ठार झाला. मृतदेह काढण्यासाठी तब्बल ४ तास लागले. तरुणांच्या निधनाने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...