spot_img
अहमदनगर'ढोकेश्वर कॉलेजचा संघ खो खो स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम'; डॉ. खिलारी यांच्या हस्ते...

‘ढोकेश्वर कॉलेजचा संघ खो खो स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम’; डॉ. खिलारी यांच्या हस्ते विजयी खेळाडूंचा सत्कार

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
शालेय क्रीडा विभाग अहमदनगर आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या पारनेर तालुका स्तरीय खो खो स्पर्धांमध्ये ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खो खो संघाने अंतिम सामान्यात ढवळपुरीच्या आश्रम शाळा संघाचा पराभव केला. विजयी संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पारनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

संघातील विजयी खेळाडूंचा सत्कार जिल्हा मराठा संस्थेचे गव्हार्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. भाऊसाहेब खिलारी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना खेळामुळे खेळाडू नम्र होतो व त्याच्यामध्ये नेतृत्वगुण तयार होत असल्याचे प्रतिपादन केले.

आश्रम शाळा ढवळपुरी येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत एकूण 26 संघांनी सहभाग नोंदविला. ढोकेश्वर जुनिअर कॉलेजच्या संघाने सेमीफायनलमधे अळकुटीच्या संघाला हारवत फायनल मधे धडक मारली. फायनल सामान्यात पंच म्हणून पारनेर क्रीडा समितीचे अध्यक्ष बापूसाहेब होळकर सर, प्रतिक सालके, चौधरी सर यांनी काम पहिले. संघांचे नेतृत्व ओमं थोपटे याने केले.

ढोकेश्वरच्या संघात शृतम रोकडे, प्रतिक ठुबे, अक्षय झावरे, श्रेयस जाधव, अस्तित्व झावरे, सुजल वाळुंज, प्रितेश मोरे, विशाल शिंदे, राजवर्धन धुमाळ, रेहान पठाण कृष्णा झावरे, सार्थक धुमाळ, वेदांत वाळुंज, वेदांत झावरे,ओंकार झावरे, शिवम क्षीरसागर, प्रथमेश पानमंद यांनी प्रतिनिधित्व केले. या खेळाडूंना मार्गदर्शन प्रा.अनिकेत बांगर, प्रा. विशाल सोबले, अतुल सैद सर, सुरेखा ठाणगे यांनी केले.

विद्यालयाच्या विजयी संघांचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, उपाध्यक्ष डॉ. विवेकजी भापकर, सहसचिव जयंतराव वाघ, खजिनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे मॅडम, संस्थेचे माजी अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी, प्राचार्य सुनिल वाव्हळ, पर्यवेक्षक शिवाजी सावंत, ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब निवडुंगे, शास्र समन्वयक प्रा.अशोक गांगड, कला समन्वयक प्रा.विजय सोबले सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक यांनी खेळाडूंचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांच्या अर्जावर शंकर राऊत यांचा आक्षेप; पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप, सचिन, अमोल कोतकर यांच्या...

मराठा आरक्षणासाठी अहमदनगर बंद!

अहमदनगर | नगर सह्याद्री मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण’ योजनेचा तिसरा हप्त्याची तारीख ठरली; कधी होणार जमा? वाचा..

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे...

Sharad Pawar: महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? शरद पवार यांनी दिले १९७७ सालचे उदाहरण! एकदा वाचाच..

Sharad Pawar: राज्यात विधानसभेचे वारे वाहु लागले आहे.महाविकास आघाडीकडून आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यास...