spot_img
ब्रेकिंगदळभद्री ‘मविआ’ सरकारमुळे राज्याची अधोगती! मंत्री विखे पाटील यांची विरोधकांवर जहरी टीका

दळभद्री ‘मविआ’ सरकारमुळे राज्याची अधोगती! मंत्री विखे पाटील यांची विरोधकांवर जहरी टीका

spot_img

पुणे | नगर सहयाद्री-
राज्यात महाविकास आघाडीचे दळभद्री सरकार होते. त्यांच्यामुळे झालेली राज्याची अधोगती निस्तरण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वतंत्र उपविभागीय महसूल कार्यालयाचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमीपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महायुतीला साथ मिळाल्याने हे ट्रिपल इंजिन सरकार काम करणार्‍या प्रत्येकाला पाठबळ देत औद्योगिक विकास व रोजगारासह विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करीत आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसलेच नाहीत.

त्यामुळे जनतेची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हते. कोरोना काळात लोकांच्या नोकर्‍या गेल्या, उद्योग व व्यवसाय ठप्प झाले असल्याने अडचणीत सापडलेल्या जनतेला वैद्यकीय व अन्य मदतीची नितांत गरज होती. महाविकास आघाडीचे नेते परदेशात व थंड हवेच्या ठिकाणी निघून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाचे अर्थकारण गतीमान होत आहे. उद्योग आणि रोजगारात वाढ झाली असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीन ऐवजी भारतात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. महाराष्ट्रात गुगल सारखी कंपनी दहा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. त्यासाठी भूखंडाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी स्वागत करत मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची यावेळी भाषणे झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...