spot_img
ब्रेकिंगठरलं! दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाचा निकाल कधी लागणार? तारीख आली समोर, पहा..

ठरलं! दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाचा निकाल कधी लागणार? तारीख आली समोर, पहा..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्णत्वास आले असून बारावीचा निकाल २५ मे च्या पूर्वी तर दहावीचा निकाल ६ जूनच्या आधी लागण्याची शक्यता आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यावर निकाल वेळेवर लागण्यासाठी शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहेत. सरकारने त्यांना पेपर तपासनीचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पेपर तपासणीचे काम अंतिम टप्यात आले असून निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार असून बारावीचा निकाल २५ मे च्या पूर्वी तर दहावीचा निकाल ६ जूनच्या आधी लागण्याची शक्यता आहे.

दहावी-बारावीचा निकाल पहा एका क्लिकवर?
विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल एका क्लिकवर बघता येईल. mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिक वेबसाइट
१) mahahsscboard.maharashtra.gov.in
२) mahresult.nic.in
३) results.gov.in
४) results.nic.in
५) hscresult.mkcl.org
६) mahahsc.in
७) mahahsscboard.in

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...