spot_img
देशहॉटेलात आढळला विवाहित महिला व 'त्या' तरुणाचा मृतदेह

हॉटेलात आढळला विवाहित महिला व ‘त्या’ तरुणाचा मृतदेह

spot_img

दिल्ली/ नगर सह्यादी
एका हॉटेलच्या रुममध्ये विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विवाहितेस दोन मुले असून तिचे तरुणासोबत प्रेम संबंध असावेत अशी माहिती समोर आली आहे. दिल्लीमधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. सोहराब (वय 28 वर्ष) आणि आयशा असं या मृतांची नावे आहेत. पोलिसांना तपासात जे माहिती समजली ती ऐकून पोलिसही चक्रावून गेले.

अधिक माहिती अशी : मृत आयशाचे सोहराब (वय २८) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. २७ ऑक्टोबर रोजी दोघांनी एका हॉटेलमध्ये ४ तासांसाठी रुम बुक केली होती. परंतु ४ तास उलटूनही दोघे बाहेर न आल्याने इतरांना शंका आली. त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, दोघांचेही मृतदेह रुममध्ये आढळून आले.

बुधवारी दोघांचाही पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला. या रिपोर्टमध्ये आयशाची गळा दाबून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. तर सोहराब याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला, असं समोर आलं आहे. सोहराब याने आधी आयशाची हत्या केली. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेतला असावा, असं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणात अजून काही माहिती हाती लागते का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर–पुणे महामार्गावर भयंकर प्रकार मोपेडवर आलेल्या दोघांनी….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- नगर–पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा) शिवारात नादुरुस्त ट्रक थांबवून...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी खास तर काही राशींना त्रासदायक ‘मंगळवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना...

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...