spot_img
ब्रेकिंगअहमदनगर: 'आमचे मराठा बांधव... 'आरक्षणाच्या मागणीसाठी चिठ्ठी लिहत तरुणाची बंधार्‍यात उडी

अहमदनगर: ‘आमचे मराठा बांधव… ‘आरक्षणाच्या मागणीसाठी चिठ्ठी लिहत तरुणाची बंधार्‍यात उडी

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. सरकार आपल्या शब्दाला जागले नाही म्हणून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी तरुणाने बंधार्‍यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. दत्तात्रेय अभिमन्यू भोगे (वय ४५ रा. खरवंडी ता. नेवासा ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मराठा आंदोलनाला अनेक जाती-धर्माच्या लोकांनी पाठींबा दिला असून सध्या गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने त्यांना ३० दिवसांची मुदत दिली होती, पण सरकार शब्दाला जागले नाही. त्यानंतर ४० व्या दिवशी जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलेआहे. जरांगे पाटील यांनी समाजासाठी अन्न,पाण्याचा त्याग केला आहे, त्यांची प्रकृती सध्या खूप खालावली आहे.

सरकार कुठलीही ठोस भुमिका गेट नसल्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी दत्तात्रेय भोगे यांनी मी जरांगे यांचे उपोषणास गेलो असता मला अभिमान वाटला आमचे मराठा बांधव सुखी व्हावेत म्हणून आरक्षण मिळण्यासाठी स्वदेह आत्मसमर्पण करून आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आहे. अशा मजकुराची चिठ्ठी लिहत गावातील साठवण तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...

‘पुढील आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत’

महिला आरक्षण उपविभागीय, तर सर्वसाधारण अन्य प्रवर्गाचे तहसील पातळीवर काढणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री ग्रामविकास विभागाने...

फडणवीस सरकारचा ‘मोठा’ निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

गैरप्रकार सहन केला जाणार नाही: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई | नगर सह्याद्री रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच...

फलक लावणे गैर काय? ते माझे काका!; आमदार रोहित पवारांनी भूमिका केली जाहीर

कर्जत । नगर सहयाद्री:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर...