spot_img
अहमदनगरलालपरीला ब्रेक! प्रवाशांचे हाल; 'या' मार्गावरील बस सेवा बंद

लालपरीला ब्रेक! प्रवाशांचे हाल; ‘या’ मार्गावरील बस सेवा बंद

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याभर आंदोलने सुरू आहेत. अनेक ठीकाणी जाळपोळ तसेच तोडफोडीच्या घटना समोर येत असल्यानेखबरदारी म्हणून एसटी महामंडळाने नगर जिल्ह्यातील महामंडळाने एसटीला ब्रेक लावला आहे. आज जिल्ह्यातून धावणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना हाल होणार असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन म्हणून एसटी बसकडे पाहिलं जातं. दररोज हजारोच्या संख्येने प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आल्याने प्रवाशांची लगबग सुरु झाली आहे. मात्र, मराठा आंदोलनामुळे लालपरीला ब्रेक लागले आहे.

मराठवाडा व बीड शहरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने फेर्‍या करण्यात अडचणी येत आहेत. सोमवारी केवळ बीड जिल्ह्यात जाणार्‍या फेर्‍या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. मंगळवारी ही लांब पाल्याच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ ग्रामीण भागातील काही फेर्‍या सुरू होत्या. आंदोलनाचा अंदाज घेऊन आगारप्रमुख बस सोडण्याचा निर्णय घेत आहे.

लालपूरीला ब्रेक लागल्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही बस अभावी हाल होत आहे. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आल्याने खरेदीसाठी ग्रामीण भागातून शहरात येणार्‍या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे खासगी वाहनदारांकडून प्रवाशांची लूट होत आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चेन स्नॅचिंग करणार्‍या टोळीच्या मुस्क्या आवळल्या

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी | चौदा गुन्ह्यांची उकल अहमदनगर | नगर सह्याद्री जिल्ह्यात चेन स्नॅचिंग...

Ahmednagar Crime: नगर पुन्हा हादरले! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

अहमदनगर । नगर सहयाद्री- नगर शहर पुन्हा एका घटनेने हादरले आहे. किरकोळ कारणावरून दोन परप्रांतीय...

कुकडी कालव्यालाच्या आवर्तना बाबत सुजित झावरे पाटलांनी दिली महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर

अमर भालके। नगर सहयाद्री कुकडी डावा कालव्याचे येत्या ३१ मे पासून आवर्तन सोडण्यात येणार...

Ahmednagar Breaking: प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या २ युवकांचा शोध घेण्यासाठी आलेल्या ‘एसडीआरएफ’ पथकाची बोट उलटली? ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

अकोले | नगर सह्याद्री उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सहा जण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता...