spot_img
ब्रेकिंगअहमदनगर: शहर पुन्हा हादरलं! एकतर्फी प्रेमात घडलं 'भयंकर'; अल्पवयीन मुलीला शेतीत नेलं...

अहमदनगर: शहर पुन्हा हादरलं! एकतर्फी प्रेमात घडलं ‘भयंकर’; अल्पवयीन मुलीला शेतीत नेलं आणि..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-

कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना सामोरे आली आहे. एकतर्फी प्रेमातुन अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करत धमकावत उसाच्या शेतामध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना नगर शहरात घडली आहे. अल्पवयीन मुलींच्या जबाबावरून तरुणारोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, अल्पवयीन मुलगी कुटूंबासह नगर शहरात वास्तव्यास आहे. शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. अल्पवयीन मुलगी कॉलेजला आली असता तिचा तरुणाने पाठलाग करत कॉलेज गेटवर तिला आवाज देत माझा मोबाईल नंबर घे, असा म्हणाला. फिर्यादी अल्पवयीन मुलीने त्यास नकार दिला.

पुन्हा अल्पवयीन मुलीगी कॉलेजला आली असता पाठलाग करत तिची अडवणूक केली. तिला त्याच्या दुचाकीवर बसवून शहरातील वारूळाचा मारूती, दातरंगे मळा परिसरातील उसाच्या शेतात नेले व तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

याप्रकरणी अल्पवयीन मुलींच्या फिर्यादीवरून अशोक (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) नावाच्या युवकाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...