अहमदनगर । नगर सहयाद्री:-
चितळे रस्त्यावर दहिहंडी उत्सव करीता स्टेज टाकून लोकांना व वाहनांना अडथळा निर्माण केल्याने नेहरू मार्केट व्यापारी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रदीप अमरसिंह परदेशी याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अंमलदार योगेश खामकर यांनी फिर्याद दिली आहे. परदेशी याने शनिवारी (३१ ऑगस्ट) सायंकाळी दहिहंडी उत्सव करीता नेता सुभाष चौक ते चौपाटी कारंजा जाणार्या रस्त्यावरील मिरावली दर्गा येथून रस्त्याने येणार्या जाणार्या लोकांना अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेज टाकून चितळे रस्ता बंद केला.
तसेच जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला. याबाबत तोफखाना पोलिसांनी वारंवार सुचना करून देखील त्याकडे दुर्लक्ष करून दहिहंडीचा उत्सव साजरा केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.