spot_img
अहमदनगरभ्रष्टाचार उजेडात! चौकशीमुळे टक्केवारी सम्राटांना पोटसुळ; विक्रम कळमकर विरोधकांवर बरसले..

भ्रष्टाचार उजेडात! चौकशीमुळे टक्केवारी सम्राटांना पोटसुळ; विक्रम कळमकर विरोधकांवर बरसले..

spot_img

सुपा । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील मग्रारोहयो अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमधील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप व त्यावर सुरू झालेली चौकशीच्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांनी या प्रकरणावर थेट विरोधकांना लक्ष्य करत चौकशीने टक्केवारी सम्राटांना पोटसुळ उठला आहे का? असा रोखठोक सवाल उपस्थित केला आहे.

पारनेर तालुक्यात आमदार काशिनाथ दाते यांच्या पाठपुराव्यामुळे रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी सुरू आहे. या चौकशीत काही कामांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांची परवानगी न घेता आणि अपूर्ण प्रस्ताव असूनही मंजुरी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका अधिकाऱ्याला अटक केली होती.

त्यानंतर आमदार दाते यांनी थेट रोहयो मंत्री यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शासन स्तरावर सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तहसिलदार पारनेर यांनी सदर कामे करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कार्यान्वयीन यंत्रणा देण्याऐवजी जाणीवपूर्वक सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद उपविभाग पारनेर यांना कार्यान्वयीन यंत्रणा देण्यात आली. सदर चौकशी मध्ये दुध का दुध पाणी का पाणी होईल.

गैरव्यवहार झाला नसल्यास कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्यांचे आर्थिक हितसंबंध या कामांशी आहेत तेच तालुक्यात आमदार साहेब विकासकामे थांबवत असल्याची टीका करत आहेत. राहिला प्रश्न विकासकामांचा तर विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीवर आमदार महोदय हे स्वत सदस्य असल्याने मोठ्या प्रमाणावर रोहयो कामे आपले मतदारसंघात होणार असल्याची माहिती विक्रम कळमकर यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...