spot_img
ब्रेकिंगपुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं चांगलंच झोडपून काढलं होतं. हा पाऊस इतका झाला की मुंबईतील रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात शेत पीकांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र त्यानंतर या पावसानं काहिशी विश्रांती घेतली तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली.

अशातच आता हवामान खात्याकडून राज्याला अलर्ट करण्यात आलं आहे. पुढील २४ तासांत कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा, ठाणे येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

यासोबतच मुंबईसह रायगड जिल्ह्याला आज (शनिवार) हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यास रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मान्सून जोरदार सक्रिय झाला असून पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...