spot_img
अहमदनगरदुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख ६० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी लालटाकी परिसरात महादेव मंदिराजवळ घडली. या प्रकरणी अशोक एकनाथ दहिफळे (वय ६३, रा. पंकज कॉलनी, समतानगर, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिफळे यांचे पेन्शन त्यांच्या स्टेट बँकेच्या जीपीओ चौक या शाखेत जमा घेते. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ते बँकेत पैसे आणण्यासाठी गेले होते. त्यांनी चेकद्वारे ५.६० लाख रुपये काढले. रोख रकमेसह चेकबुक व इतर कागदपत्रे त्यांनी त्यांच्या दुचाकीच्या (एमएच १६ बीएल ३८२४) डिक्कीत ठेवली.

तेथून कोठलामार्गे ते लालटाकी येथील महादेव मंदिराजवळ आले. दुचाकी लावून ते रस्त्याच्या पलीकडे लघुशंकेसाठी गेले. परत आल्यावर चहा स्टॉलवर चहा घेऊन ते निघाले असता त्यांना गाडीच्या सीटचे रबर निघालेले दिसले. त्यांनी डिक्की उघडून पहिले असता पैसे व कागदपत्रे आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...