नगरसह्याद्री / मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. सध्या या आजाराचे जास्त रुग्ण नव्हते. परंतु मागील काही दिवसात कोरोना पुन्हा हातपाय पसरायला लागला आहे. भारतात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याची चर्चा होती तर आता गोव्यामध्येही करोना विषाणूचा नवा उपप्रकार असलेल्या ‘जेएन १’चे रुग्ण सापडले आहेत. सर्व लोकांनी बाहेर पडताना, आवश्यकतेनुसार मास्क घालावे, सोशल डिस्टन्सचे पालन करावे आणि वारंवार हात धुवावे, स्वच्छता बाळगावी अशा सूचनाही आरोग्य विभागातर्फे देण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात स्थिती काय?
देशात सध्या 2311 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असल्याने महाराष्ट्र सरकार सावध झाले आहे. WHO च्या म्हणण्यानुसार कोरोनाचा हा व्हायरस लवकर पसरत आहे, जे अत्यंत धोकादायक आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45 इतकी असून त्यातील 27 रुग्ण मुंबईत आहेत. ठाणे 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापूरमधील 1 रुग्ण असे रुग्ण आहेत.
काय काळजी घ्याल ?
– गरज नसेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
– बाहेर जाताना, मास्कचा वापर अवश्य करा.
– वैयक्तिक स्वच्छता बाळगा, हात वारंवार धुवा.
– बर नसेल, सर्दी-खोकला- ताप , काहीही त्रास होत असेल तर दुखणं अंगावर काढू नका, त्वरित डॉक्टरांकडे जा.
व्हायरसची किती भीती ?
JN.1 हा ओमिक्रॉन व्हेरीयंटचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे या व्हेरीयंटची भीती बाळगण्याची गरज नाही तथापी कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असे आरोग्. विभागातर्फे सांगण्यात आले.