मुंबई।नगर सहयाद्री
Cold Weather Update: राज्याततील अनेक भागात तापमानाचा पारा घसरल्याचे चित्र समोर येत आहे. सोमवारपासून राज्यातीलअनेक भागात थंडी वाढताना दिसत आहे. राज्यात लोक गरम कपडे घालून घराबाहेर पडताना दिसत असून अनेक ठिकाणी तर शेकोट्या पेटवून नागरिक ऊब घेताना दिसत आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं आहे. याचा परिणाम देशासह राज्याच्या हवामानावर होताना दिसत आहे. आता काही दिवस तापमानात वाढ होताना दिसेल. मात्र, 25 डिसेंबरनंतर वेस्टर्न डिस्टबर्न्स तसेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात हळूहळू तापमानाचा पारा घसरत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान १२ अंशाखाली गेलं आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. नागरिकांनी शेकोट्यांसह उबदार कपडे सुद्धा वापरण्यासाठी काढले आहेत.