spot_img
राजकारणकाँग्रेसचा विजय तेलंगणात, नशीब फळफळलं महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचं !

काँग्रेसचा विजय तेलंगणात, नशीब फळफळलं महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचं !

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई : देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यात. यात तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली. या विजयात तेलंगणातील नेत्यांसोबत महाराष्ट्रातील एका नेत्याचा मोठा वाटा आहे.

या नेत्याचं नाव आहे माणिराव ठाकरे. माणिकराव ठाकरे यांचं नशीब आता फळफळणार आहे. त्यांना आता मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 5 राज्यांच्या विधासभेच्या निकालात भाजप पक्षाने सरशी मारली.मात्र तेलंगणा राज्यात मात्र काँग्रेसने सत्ता खेचून आणली. या तेलंगणा राज्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर जबाबदारी होती.

त्यांच्या नेतृत्वात तेलंगणा राज्यात निवडणूक लढली गेली. तेलंगणातील जनतेने काँग्रेसच्या रणनितीला चांगला प्रतिसाद दिला आणि सत्ताबदल हा झाला. या विजयानंतर माणिकराव ठाकरे यांना राज्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर राज्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची चिन्हे आहेत. पूर्ण वेळ विभाग निहाय प्रभारी नेमण्याची काँग्रेस कडून शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम पाहणारे एच के पाटील यांच्या जागेवर नवीन प्रभारी नेमण्यात येणार आहे.

पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशा तऱ्हेने काँग्रेस पक्षाने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श् वभूमीवर काँग्रेस हायकमांड महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मायक्रो लेव्हल प्लॅनिंग करणार आहे. यामध्ये माणिकराव ठाकरे यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...