spot_img
अहमदनगरAhmednagar: भूखंड बचावासाठी काँग्रेसचे 'सद्बुद्धी दे' आंदोलन!! काळे म्हणाले,'हे' पाप केले तर...

Ahmednagar: भूखंड बचावासाठी काँग्रेसचे ‘सद्बुद्धी दे’ आंदोलन!! काळे म्हणाले,’हे’ पाप केले तर…

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आंदोलकांनी मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या सुमारे पावणेचार एकर क्षेत्राच्या भूखंड बचावासाठी तथाकथित दलाल यांना सद्बुद्धी दे आंदोलन केले. 

यावेळी मनोज गुंदेचा, संजय झिंजे, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, किशोर कोतकर, शंकर आव्हाड, अभिनय गायकवाड, आकाश आल्हाट, गणेश चव्हाण, चंद्रकांत उजागरे, गणेश आपरे, गंगाधर जवंजाळ, सुनील भिंगारदिवे, देवराम शिंदे, बाबासाहेब वैरागर, सचिन वाघमारे, दीपक ससाणे, संजय आवारे आदींसह आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना काळे म्हणाले, हा राजकारणाचा विषय नाही. मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा विषय आहे. या चुकीच्या आणि हिंद सेवा मंडळाच्या शैक्षणिक हिताला बाधा आणणाऱ्या निर्णयापासून संबंधितांनी परावृत्त झाले पाहिजे. यांनी जर हे पाप केले तर त्यांना परमेश्वर सुद्धा आता माफ करणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. जागा व्यवसायिकांच्या घशात बेकायदेशीर रित्या घालून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान यातून होणार आहे. संस्थेच्या हजारो माजी विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संतापाची लाट निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...